नागपूर : ३० ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन साजरे केले जात आहे. मात्र टपाल खात्याच्या भोंगळ कारभारामुळे अनेक भगिणींना त्यांच्या भाऊरायाला राखी पाठवता न आल्याने त्यांना निराश व्हावे लागले.
लग्नानंतर, शिक्षणासाठी, नोकरीच्या निमित्ताने घरापासून, परगावी राहणाऱ्या महिला त्यांच्या भाऊरायाला टपालाच्या (पोस्टाच्या) माध्यमातून राख्या पाठवतात. यासाठी टपाल खात्याच्या स्पीड पोस्ट सेवेचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून ही पद्धत आहे. रक्षाबंधन जवळ येताच टपाल कार्यालय, कूरियर सर्विसमध्ये गंतव्य ठिकाणी राख्या पाठवण्यासाठी धावपळ सुरू असते. यंदा काही टपाल कार्यालयातील स्पीड पोस्ट सेवा ठप्प झाली होती.
हेही वाचा – ‘तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझी…’, अमरावती विद्यापीठ परिसरात युवकाची युवतीला शिवीगाळ
हेही वाचा – रेल्वेने नागपूर-शहडोल नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय का फिरवला?
नरेन्द्र नगर टपाल कार्यालयात सोमवारी असाच प्रकार घडला. त्यामुळे अनेक भगिणींना त्यांच्या भाऊरायाला राखी पाठवता आली नाही. प्रिंटर खराब झाल्याने स्पीड पोस्ट सेवा काही काळ बंद असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. इतर टपाल कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला.