नागपूर: माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखी, दणक्यांमुळे मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते. दुचाकीधारकांसह रिक्षा, टॅक्सी आणि बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये पाठ व कंबरदुखीचा त्रास बळावतो. स्पाँडेलिसिस, लम्बर्स स्पॉंडेलिसीस, स्लीप डिस्क असे आजार होतात. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) ‘स्पाइनल कॉर्ड इंज्युरी टेलि’सेंटर तयार करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच सप्टेंबर रोजी एम्समध्ये ‘स्पाइनल कॉर्ड इंज्युरी’ दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. एम. हनुमंत राव, विभागप्रमुख डॉ. मृणाल पाठक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार उपस्थित होते. डॉ. राव म्हणाले, एम्समध्ये दर मंगळवारी, गुरुवारी दुपारी २ ते ५ या वेळेत स्पायनल कार्ड इंज्युरी टेलि पुनर्वसन केंद्रात ७३७८६००७५१ या मोबाईल क्रमांकवर माहिती विचारता येईल.

हेही वाचा… भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे! डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन

उपचारासाठी एम्समध्ये दाखल होता येईल. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले, रुग्णांनी घरगुती उपाय टाळावेत, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. या रुग्णांनी विश्रांती घेण्याची गरज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spinal cord injury tele rehabilitation center in aiims nagpur mnb 82 dvr
Show comments