नागपूर : संघ विचाराशी असहमत असल्याने आम्ही संघाच्या रेशीमबागमधील स्मृतिमंदिर स्थळी जाणार नाही, अशी स्पष्ट् भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीचे विदर्भातील दोन आमदार गुरूवारी नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृतिमंदिर स्थळी हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन घेऊन आले. त्यामुळे संघ विचाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसून आले.

भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांची राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृती मंदिराला भेट आयोजित केली जाते. तेथे संघाचे नेते आमदारांना संघ काय आहे, संघाची भूमिका व तत्सम मुद्यांवर बौद्धिक देतात. प्रामुख्याने भाजपचे सर्व आणि मित्र पक्ष शिवसेनेचे आमदार स्मृती मंदिरात हजेरी लावतात. भाजप -सेना युतीत आता राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी झाला. या गटाची संघाबाबतची भूमिका वेगळी आहे. २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशना दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार स्मृती मंदिरात गेले नव्हते. मनुवादी विचारसरणीला पक्षाचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मांडली होती. खुद्द अजित पवार यांनीही संघाच्या विचाराशी आमचा पक्ष सहमत नाही, असे मागच्यावर्षी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : यंदाचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार

यंदा भूमिकेत बदल ?

२०२४ मध्ये अधिवेशना दरम्यान परंपरेनुसार महायुतीच्या आमदारांची स्मृतीमंदिर भेट ठरली. यावेळी राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार स्मृती मंदिराला भेट देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागच्यावर्षीचीच भूमिका अजित पवार यांनी कायम ठेवली का ? की बदलली हे पाहणे औत्स्युक्याचे होते. यावेळी मात्र अजित पवार गटाचेदोन आमदार स्मृतीमंदिर स्थळी हेडगेवारांच्या समाधीवर डोके ठेवताना दिसून आले. हे दोन्ही आमदार विदर्भातील आहे. त्यात राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव) आणि राजू कारमोरे (तुमसर) या दौन वैदर्भीय आमदारांचा समावेश आहे. बडोले हे मुळचे भाजपचे आहेत. ते यावर्षी निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवीदीत प्रवेशकर्ते झाले व त्यापक्षाकडून निवडूनही आले. त्यांचा डीएनए भाजप-संघाचाच आहे. फक्त कारेमोरे यावेळी गेले आहेत, या दोन आमदारांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष छबीला तडे गेले आहे. त्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू झाली आहे. अजित अजित पवार संघाच्या दबावाखाली आले का ? असा सवाल केला जात आहे.

हे ही वाचा… भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही

कारमेमोरे काय म्हणाले

यासंदर्भात आमदार राजू कारेमोरे म्हणाले, स्मृती मंदिरात जाऊ नये, अशी कोणतीही सूचना मला पक्षाकडून देण्यात आली नव्हती. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करेल.

Story img Loader