चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात खेळांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे जिल्हा सातत्याने चर्चेत राहिला आहे. पुढील महिन्यात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा देखील होणार आहे. अशात ऑलिम्पिकचे मिशन गाठायचे असेल तर चंद्रपूरचे क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने बल्लारपूर येथे मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना पत्राद्वारे केली आहे.

क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना आणखी सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात. यासंदर्भात जिल्ह्यातील क्रीडा संघटना, प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी चंद्रपूर येथे क्रीडा प्रबोधिनी स्थापन व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बल्लारपूर (जि. चंद्रपूर) क्रीडा संकूल येथे मैदानी व बॉक्सिंग खेळाची निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करावी, असे मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

हेही वाचा – सणासुदीच्‍या दिवसांत एसटीला ६ कोटींचे उत्‍पन्‍न

“चंद्रपूर आणि गडचिरोली हे नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हे असून या जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलिम्पिकमध्येही भरारी घ्यावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांना सादर केला आहे. क्रीडा संकुलातील अद्यावत क्रीडा सुविधांचा विचार करता तसेच खेळाडूंची मागणी लक्षात घेता याठिकाणी मैदानी खेळ व बॉक्सिंग खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता द्यावी,” अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हेही वाचा – वर्धा : उद्योग मंत्री उदय सामंत म्हणतात, विनाउद्योग भूखंड परत घ्यावे

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल हे राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुका क्रीडा संकूल आहे. अलीकडेच याठिकाणी राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर आता २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील होणार आहे.

Story img Loader