उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराची साथ ९४ गावात पोहोचली असून आतापर्यंत ५४४ जनावरांना त्याची बाधा झाली. मृत्यूसंख्या तीनवरून पाच वर गेली आहे. उपचारानंतर एकूण ३९१ जनावरे रोगमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा- नागपूर : विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ‘अभाविप’चे आंदोलन
लम्पी आजाराची साथ हळूहळू कमी होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी बाधित गावांच्या संख्येत मात्र सातत्याने वाढ होत चालली आहे. २८ सप्टेंबरला बाधित गावांची संख्या ५१ होती व जनावरांच्या मृत्यूची संख्या ३ होती. १ऑक्टोबरला बाधित गावांच्या संख्येत तब्बल ४२ ने वाढ होऊन ती ९३ वर पोहचली. २ ऑक्टोबरला त्यात आणखी एका गावाची भर पडली व जनावरांच्या मृत्यूंची संख्या सहापर्यंत पोहोचली. १४७ पशूंवर उपचार सुरू आहेत. ४ लाख १८ हजार ५४८ गायींपैकी २,६६२५१ जनावरांचे लसीकरण झाले.