वाशीम : अयोध्या येथे आज श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असून संपूर्ण देशात राम नामाचा गजर सुरु आहे. या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रम होत आहेत. मात्र, प्रत्यक्षात जेथे प्रभू रामचंद्राचे वास्तव्य वनवासाच्या काळात झाले ती मालेगाव तालुक्यातील निसर्गाच्या कुशीतील श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन तपोवन भूमी दुर्लक्षित होत असून सीता मातेची नाहणीदेखील अखेरची घटका मोजत आहे.

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे ते मसला खुर्द दरम्यान घनदाट जंगलाच्या कुशीत श्री क्षेत्र तपोवन संस्थान प्राचीन व प्रसिद्ध आहे. येथे श्री राम, लक्ष्मण व सीता वनवासादरम्यान वास्तव्यात असल्याची अख्यायिका आहे. त्याच काळातील माता सीताची नाहणी अस्तित्वात होती. मात्र कालांतराने ती वास्तू अखेरची घटका मोजत आहे. सर्वत्र प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण आहे. अनेक मंदिरात रोषणाई, दिवे, भगवे ध्वज लावून श्री रामाचा जयघोष होत असताना प्राचीन व ऐतिहासिक वारसा जोपसणारी रामाच्या पावलांनी पवित्र झालेली तपोवन भूमी मात्र आजही दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.

Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
gold-plated prabhawal offered to Mahalakshmi
कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण
Siddhivinayak Temple
Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? व्हायरल VIDEO वर मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय?
Restoration of Shree Chatu Shringi Temple is nearing completion ahead of Sharadiya Navratri festival
पुणे : नवरात्रोत्सवापूर्वी चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास,मंदिर रविवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले
animal meet tirupati laddu marathi news
तिरुपतीमधील लाडू वाद चिघळला
teacher robbed, Solapur, social media,
सोलापूर : समाज माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शिक्षकाला लुटले
guardian minster mps and mlas remain absence in marathwada liberation day event
मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी

हेही वाचा – यवतमाळ राममय : मंदिरे सजली, नागरिक दीपोत्सव साजरा करणार; सुरक्षेसाठी दीड हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

हेही वाचा – Ram Mandir Ayodhya Inauguration Live: “मोदींनी कधीच प्रभू श्रीराम यांच्या तत्त्वांंचं पालन केलेलं नाही”, भाजपा नेत्याची परखड टीका!

निसर्गाच्या कुशीतील तपोवन !

मालेगाव तालुक्यातील तपोवन येथील घनदाट जंगलाच्या कुशीत प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात नंदेश्वराचे शिवलिंग असून मंदिरासमोरील सभा मंडपात शिवानंद मूर्ती आहे. मंदिराच्या ईशान्य भागाला छोटी नदी वाहते मंदिराच्या परिसरात रेणुका देवीचे मंदिर असून ते उत्तर भिमुख आहे. मंदिराच्या आत पश्चिमेस शनि देवाची मूर्ती स्थापन करण्यात आली असून मंदिरालगतचा भाग वनविभागाने निसर्ग पर्यटन म्हणून घोषित केलेला आहे.