२२ जानेवारी रोजी अयाेध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने लंकेतील ( श्रीलंका) अशोका वाटीकेतील  श्रीराम आणि जानकीच्या पादुका अयोध्येत नेण्यात येणार आहे.नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिरात पूजन करण्यात आले. येथून त्या अयोध्येत स्थापन होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामवन गमन मार्गाचा सविस्तर अभ्यास करणारे रामवतार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘राम राज्य युवा यात्रे’ च्या माध्यमातून श्रीराम – जानकीच्या पादुका श्रीलंकेतील अशोक वाटिका येथून अयोध्येला नेण्यात येणार आहेत. ही यात्रा रविवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली. यात्रेसोबत पादुकाही आहेत श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या हस्ते पादुकांचे स्वागत व पूजन करण्यात आले. तेथे दीपप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sriram janaki paduka from ashoka valley in lanka at nagpur cwb 76 amy
Show comments