लोकसत्‍ता टीम

अमरावती : परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथानजीक एसटी बसने पेट घेतला. ही घटना घडल्यानंतर काही वेळ प्रवाशांचा थरकाप उडाला. या दुर्घटनेत एसटी बस संपूर्ण जळाली असून बसमधील प्रवाशांना त्‍वरित उतरविण्‍यात आल्‍यामुळे अनर्थ टळला. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली.

Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Anna Sebastian Death EY Company First Reaction
Anna Sebastian : अ‍ॅना सेबेस्टियनच्या मृत्यूमुळे खूप वाईट वाटलं, आम्ही …, EY कंपनीचं स्पष्टीकरण, आईने केला होता ‘ओव्हरवर्क’चा आरोप
Tirupati Balaji Prasad Animal Fat Used Latest News
Tirupati Balaji Prasad : “तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर..”, चंद्राबाबू नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
pager blast lebanon reuters
Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

यवतमाळ जिल्‍ह्यातील नेर आगाराची यवतमाळ ते चिखलदरा ही एमएच ४० / एक्‍यू ६१६९ क्रमाकांची महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस चिखलदरा येथे जात असताना मोथा गावाजवळ घाट वळणावर अचानक एसटी बसच्या चालकाच्या केबीनमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना चालक आणि वाहकाने उतरवले आणि बस रिकामी करण्यात आली. काही मिनिटांत बसने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळाली.

आणखी वाचा-PM Modi To Visit Wardha : ‘नो फ्लाय झोन’… पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी खबरदारी

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्‍थळी पोहचले. स्‍थानिक नागरिकांच्‍या मदतीने बसची आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरू करण्‍यात आले. एका कंत्राटदाराने टँकर पाठवून आग आटोक्‍यात आणण्‍यास मदत केली. सुमारे दोन तासांच्‍या प्रयत्‍नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात आले, पण बस संपूर्ण जळाली.

बसच्‍या चालकाला बसच्‍या समोरच्‍या भागातून धूर येत असल्‍याचे लक्षात आले. त्‍याच क्षणी चालकाने घाटाचा रस्‍ता असूनही प्रसंगावधान राखत बस थांबविली. त्‍याचवेळी बसने पेट घेतला. चालक आणि वाहक यांनी धैर्याने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी प्रवाशांनी आरडाओरड केल्‍याने परिसरातील नागरिक धावले, परंतु बघण्‍यापलीकडे ते काहीही करू शकत नव्‍हते. बस पेटल्‍याची माहिती चालकाने आगाराला कळवली. दरम्यान, एसटी बसला आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.

आणखी वाचा-लोकजागर: प्रिया फुकेंच्या निमित्ताने…

दरम्‍यान, सामाजिक कार्यकर्ते शेख नासीर अब्‍दूल गनी यांनी आपला वैयक्तिक पाण्‍याचा टँकर पाठवून आग आटोक्‍यात आणण्‍यास मदत केली. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमरावती शहरापासून २० किलोमीटर दूर पिंपळविहीर गावाजवळ एसटी बसला अचानक आग लागली होती. ही एसटी ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळीही चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला होता. नागपूर आगाराची ही एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. धावत्या एसटी बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरली. त्यानंतर पाहता पाहता एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. एसटी बसला आग लागल्याने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती.