यवतमाळ  – पुसद येथील एसटी आगाराच्या चालक- वाहक विश्रांती कक्षामधील स्वछतागृहात एका वाहकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक पुंडलिकराव डोईफोडे (५१) रा. पार्वतीनगर, पुसद असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी उजेडात आली.

पुसद आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले अशोक डोईफोडे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक  विवंचनेत होते. आर्थिक विवंचनेत नैराश्य आल्याने गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी  त्यांच्याजवळ सापडली. गेल्या पाच, सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे कामावर जाणे बंद असल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांना नैराश्य आले होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पुसद शहर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

Story img Loader