नागपूर : केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या वैश्विक ओळखपत्राला (यूडीआयडी) ग्राह्य धरून अपंग प्रवाशांही नियमानुसार सवलत देण्याचे आदेश परिवाहन महामंडळाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतरही यूडीआयडीवर ही सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत, त्याखालील ६५ ते ७४ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, अपंगांना ५० ते ७५ टक्के, विद्यार्थी, स्वतंत्र सेनानीसह इतरही गटातील नागरिकांना प्रवास भाडय़ात विविध सवलती दिल्या जातात. पूर्वी अपंगांकडे वेगळय़ा पद्धतीचे प्रमाणपत्र असायचे. परंतु नंतर केंद्र सरकारने यूडीआयडी हे वैश्विक ओळखपत्र देणे सुरू केले. या प्रमाणपत्राची माहिती सर्वश्रूत असून एसटी महामंडळानेही यापूर्वी सर्व विभाग नियंत्रकांना अपंगांच्या सवलतीसाठी हे ओळखपत्र ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही बऱ्याच भागात एसटी कर्मचारी हे ओळखपत्र नाकारात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेवटी एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना अपंगांचे यूडीआयडी ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षकीय कर्मचारी, वाहक यांना सूचना देण्याचेही आदेशात नमूद आहे.

सर्वच अपंगांना एसटीच्या प्रवास भाडय़ातील सवलतीचा लाभ दिला जातो. या सवलतींपासून कुणी वंचित राहू नये म्हणून महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना अपंगांचे यूडीआयडी हे ओळखपत्र ग्राह्य धरण्याच्या सूचना केल्या आहेत.

शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus denied concession on udid of disabled persons zws
Show comments