लोकसत्ता टीम
बुलढाणा: मलकापूरहून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी एसटी बस आज मर्दडी घाटात कोसळली. मात्र बसमधील १३ प्रवाश्यासाह चालक-वाहक दैव बलवत्तर म्हणून बचावले. यात सहा जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आगाराची बस (एम एच ४० वाय ५४८१) संभाजीनगर कडे जात होती. दरम्यान दुधा मर्दडी देवी घाटा वळणावर बस उलटली. यानंतर बाजूचा कठडा तोडुन घाटात कोसळली. सुदैवाने प्राणहानी टळली असून १३ पैकी प्रवासी होते. पैकी ६ जण जखमी झाले आहेत.
आणखी वाचा-नांदेडमधील अधिष्ठात्यांचा अपमान, नागपुरात वैद्यकीय शिक्षक संतप्त..
तिघांवर प्राथमिक उपचार करुन सुट्टी देण्यात आली. दोघांवर बुलढाणा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. यामध्ये वनीता एकनाथ एकडे व एकनाथ एकडे यांचा समावेश आहे. सय्यद बानो रियाज अहेमद या महिलेवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा येथील रहिवासी आहे.