लोकसत्ता टीम
नागपूर : एक तारीख, एक तास, एक साथ स्वच्छता अभियानाला विविध स्तरावर चांगला प्रतिसाद आहे. एसटी महामंडळही आता १ ऑक्टोंबरपासून बसमध्ये अस्वच्छता आढळल्यास आगार व्यवस्थापकाला ५०० रुपये दंड करणार आहे.
एसटी महामंडळाकडून पाच महिन्यांपासून राज्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवले जात आहे. या अभियानानंतरही राज्यातील काही भागात प्रवाश्यांसह विविध संघटनांकडून अस्वच्छतेबाबत तक्रारी कमी होत नाही. त्यामुळे महामंडळाने आता आगार व्यवस्थापकांना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहे. स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचनाही काढण्यात आल्या आहे.
आणखी वाचा-विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अधिकार, न्यायालय काय म्हणाले सविस्तर जाणून घ्या…
नवीन सूचनेनुसार बस मार्गस्थ होण्यापूर्वीच त्याची स्वच्छता आगारात होणे आवश्यक आहे. सोबत बसच्या तपासणीबाबत एक विशेष नमुना तयार करून त्यात १० गुन निश्चित केले गेले. त्यात सातहून कमी गुन असल्यास बसची स्वच्छता असमाधानकारक माणली जाणार आहे. दरम्यान विभाग नियंत्रकांनाही महिन्यात १५ बसेसची स्वच्छता तपासणी करायची आहे. सोबत मध्यवर्ती कार्यालयाकडून नियुक्त सर्व पालक अधिकारी, स्वच्छता अभियानाचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष व समिती सदस्यांनाही त्यांचे नियमित काम करून या बसेसची स्वच्छता तपासणी करायची आहे. त्यात अस्वच्छता बसमध्ये आढळल्यास आता संबंधित आगार व्यवस्थापकाला ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. ही मोहिम १ ऑक्टोंबर २०२३ पासून राबवण्याचे आदेश असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या वृत्ताला एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दुजोरा दिला आहे.