महेश बोकडे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) बसेस सुस्थितीत असल्याचा दावा केला जातो. परंतु काहींची डिक्की लॉक तर काहींची स्थिती वाईट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘एसटी’तून पार्सल वाहतुकीसाठीचे कंत्राट मे. किसनलाल गेहिराम ॲन्ड कंपनीकडे दिले गेले. या कंत्राटदाराला पार्सलच्या कामादरम्यान बऱ्याच बसेसच्या डिक्की नादुरुस्त असल्याचे निदर्शनात आले. ही तक्रार त्यांनी महामंडळाला केली.
दरम्यान, महामंडळाने राज्यातील सर्व यंत्र अभियंता (चालन) यांना बसेसची डिक्की दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशात आपल्या विभागातील सर्व वाहनांच्या समान कक्ष (डिक्की) सुस्थितीत असल्याची तपासणी विशेष मोहिमेद्वारे घ्यावी, सामान कक्षाच्या दरवाजाचे लॉक सुस्थितीत व कार्यरत असावे, पार्सल- कुरूअर ठेवताना सुलभरित्या दरवाजा उघडता व बंद करता येईल असे असावे. सामान कक्षाचा दरवाजा कायमस्वरूपी बंद करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या विषयावर एसटीचे नागपूर व अमरावती प्रदेशाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांना विचारणा केली असता त्यांनी जास्त बोलणे टाळले. परंतु विदर्भातील सगळ्याच बसमधील डिक्की सुस्थितीत केली जाणार असल्याचा दावा केला.