नागपूर : नागपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. इतरही प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत आणखी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट घासत गेली. या घटने बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले.

हेही वाचा…मुलीचे बंड, सर्वेक्षण व गोपनीय यंत्रणेचा अहवाल विरोधात, तरी साधली विजयाची किमया…

दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे ८ मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळाले होते. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य बघत तेथे धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथम जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात व तेथून काही गंभीर रुग्णांना इतरत्र तातडीने हलवण्यात आल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. वृत्त मिळेपर्यंत सुमारे आठ मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले होते.

हेही वाचा…राज्यात ग्राहकांचे वीज देयक झाले कमी… प्रधानमंत्री सूर्यघर योजना…

एसटीच्या प्रवासावर गंभीर प्रश्नचिन्ह…

सर्वात सुरक्षीत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून एसटीच्या प्रवासी वाहतुकीकडे बघितले जाते. परंतु या अपघातामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षीततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान एसटी महामंडळ सध्या आर्थिक कोंडीत आहे. त्यातच महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याचदा आंदोलनही केले जाते. आंदोलनादरम्यान कामगार संगटनांकडून बऱ्याचदा एसटी बसेसच्या देखभाल- दुरूस्तीच्या कामासह महामंडळात नवीन बसेस येण्याचे प्रमाण कमी असल्याने भंगार बसेसचे प्रमाण जास्त असल्याचाही आरोप होतो. त्यामुळे महामंडळात जुन्या व कालबाह्य बसेसमुळे अपघात वाढत आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिकारी अपघात झालेल्या घटनास्थळी निघाले अशून लवकरच पोहचणार असल्याचे सांगितले. त्यानंतरच वास्तविक स्थळी सांगणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणने होते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus overturned near davwa village recovering eight bodies on gondia sadak arjuni route mnb 82 sud 02