नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील १३ कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात लढा उभारला आहे. या समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० ऑगस्टला मुंबईत बैठक आयोजित केली होती. ही बैठक स्थगित झाल्याने एसटी कर्मचारी संतापले आहेत.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचेही वेतन करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. यासाठी १३ संघटनांनी एकत्र येत लढा उभारला आहे. या आंदोलनाची दखल घेत सरकारने कृती समितीसोबत चर्चा सुरू केली. आर्थिक व इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्रिसदस्यीय समितीही गठित केली. ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांसोबत २० ऑगस्टला बैठक घेण्याचे ठरले. परंतु, लाडकी बहीण योजनेमुळे व्यस्ततेचे कारण पुढे करत मंगळवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली. त्यामुळे कृती समितीला महामंडळासोबतच बैठकीचे सोपस्कार आटोपावे लागले. बैठक स्थगित झाल्याने कामगारांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला.

Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

हेही वाचा – VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

मुख्यमंत्र्यांची बैठक स्थगित झाल्याने कृती समितीनेही नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी कामगारांचे आंदोलन पुन्हा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या विषयावर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यस्ततेमुळे २० ऑगस्टची बैठक स्थगित केली. लवकरच नव्याने बैठक घेऊन कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा, ३ सप्टेंबरपासून राज्यात आंदोलन केले जाईल. – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमध्ये बदल करावा, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी.

हेही वाचा – Rain Updates : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ विभागांना ‘यलो अलर्ट’

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.