नागपूर : एसटी महामंडळाकडून त्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली १,१००कोटी रुपयांची रक्कम पी. एफ. ट्रस्टमध्ये भरली गेली नाही. त्यामुळे या सगळ्यांना त्यांच्या पीएफ मध्ये जमा रक्कमेतून अग्रीमची मागणी करणारे २,५०० कर्मचारी ऑक्टोंबर पासून पीएफ अग्रीम रक्कमेच्या प्रतीक्षेत आहे. या विषयावर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने गंभीर प्रकार पुढे आणला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी महामंडळातील २,५०० कर्मचाऱ्यांना मुला- मुलींची लग्ने, आजारपण व शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने पी. एफ. अँडव्हान्स रकमेसाठी अर्ज केला. परंतु रक्कम मिळत नसल्याने एसटीत कर्नाटक पॅटर्न राबविण्यात यावा, अशी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८९ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे १,१०० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे १, ०००कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २,१०० कोटी रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही.

हेही वाचा…बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…

पीएफ ट्रस्ट मधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी ऍडव्हांस रक्कम घेत असतात. पण गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही. त्यामुळे ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यभरातील एसटीच्या २,५०० कर्मचाऱ्याना ऑक्टोंबर २४ पासून आता पर्यंत पीएफची ऍडव्हांस रक्कम मिळालेली नाही. आपलीच रक्कम मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहे. स्वतःचे आजारपण किंवा कुटुंबीयांचे आजारपण, मुला- मुलींची लग्ने, शाळा, कॉलेजची फी भरण्यासाठी सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे . दीर्घकालीन संपाच्या दरम्यान उच्च न्यायालयात एसटीला खर्चाला कमी पडणारा निधी देण्याचे कबूल करून सुद्धा सरकार वारंवार फसवणूक करीत आहे.असा आरोपही बरगे यांनी केला आहे.

हेही वाचा…यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

कर्णाटका फॉर्म्युला काय आहे?

महाराष्ट्र एसटी प्रमाणेच कर्नाटक एसटी सुद्धा आर्थिक अडचणीत सापडली असली तरी तिथे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू आहे. कर्नाटक एसटीला खर्चाला निधी अपुरा पडल्यास तिथे कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी कर्ज घेतले जाते. त्यांच्याकडेही मध्यंतरी पी. एफ. अँडव्हान्स रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध न्हवता. पण तिथल्या सरकारने मध्यस्थी करून कर्नाटक एसटीला कर्ज करण्यासाठी स्वतः मध्यस्थी केली. घेतलेल्या कर्जाची हमी घेऊन २ हजार कोटी रुपये इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळऊन दिली. साहजिकच कर्मचाऱ्यांना त्यांची पी. एफ. अँडव्हान्स रक्कम मिळाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी बरगे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St corporation deducted rs 1100 crore from salaries 2500 employees await pf since october mnb 82 sud 02