नागपूर : दिवाळीत मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारून प्रवाशांची लूट करतात. हा प्रकार थांबवण्यासाठी एसटीने नागपूर-पुणे आणि इतरही मार्गासाठी विशेष नियोजन केले आहे.

राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होतो. त्यामुळे या काळात नागरिक मुळ गावी, नातेवाईकांकडे जातात. त्यामुळे प्रवाश्यांची गर्दी वाढते. त्याचा गैरफायदा ट्रॅव्हल्स कंपन्या घेतात. ते प्रवासी भाड्यात भरमसाट वाढ करून लूट करतात. तसेच खाजगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नसल्यामुळे प्रवासी जनतेचा वेळ वाया जातो. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नागपूर विभागातर्फे ७ नोव्हेंबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत नागपूर पुणे नागपूर (शिवशाही आसनी व साधारण आसनी) या मार्गावर नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर-पुणे या मार्गावर गणेशपेठ बसस्थानकावरून जादा शिवशाही आसनी, साधी बसेस १५ नोव्हेंबरपासून दुपारी १ वा., ३ वा., ४ वा., ६ वा. या नियमित वेळेच्या व्यतिरिक्त संध्याकाळी ५ आणि ७ वाजता जादा बसेस पुणेसाठी सोडल्या जातील.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

हेही वाचा – वर्धा : माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची पाऊण कोटीने फसवणूक, गुन्हा दाखल

हेही वाचा – शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख विरुद्ध पदाधिकाऱ्यांचे बंड!

प्रवासी वर्दळ वाढल्यास जादा बसेसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच नागपूर-माहुर, सावनेर-माहुर, नागपूर-वाशिम, नागपूर-गोंदिया, सावनेर- गोंदिया, उमरेड-अमरावती आणि इतरही भागांत जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूरच्या विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांनी केले.

Story img Loader