बुलढाणा: पंढरपूरच्या आषाढी यात्रेदरम्यान कळत नकळत झालेल्या ‘भ्रष्टाचार’ प्रकरणी कारवाई न करण्यासाठी दोघांनी रोख भ्रष्टाचार केला अन दोघेही ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले. दोन्ही आरोपी हे मावस भाऊ आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै महिन्यात पार पडलेल्या पंढरपूर आषाढी यात्रेदरम्यान एका मजेदार भ्रष्ट आचाराच्या घटनेचा व्हिडीओ सार्वत्रिक झाला होता. तक्रारदार (फिर्यादी) वाहक इतर कर्मचाऱ्यांसोबत बुलढाणा एसटी विभागाच्या बस मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करीत असल्याचा तो व्हिडिओ होता. यासंदर्भात कुठलीही कार्यवाही करणार नाही असे आश्वासन बुलढाणा बस आगाराचे आगार व्यवस्थापक संतोष महादेव वानरे (५०वर्ष) यांनी त्याला दिले. अर्थात यासाठी वानेरे याने तब्बल ४० हजारांची लाच मागितली. यानंतर व्यवस्थापकचा मावस भाऊ तथा बस वाहक महादेव दगडू सावरकर (४३ वर्ष) याच्या मध्यस्थीने ३५ हजारात सौदा ठरला.

हेही वाचा… बुलढाणा: बस व दुचाकीची धडक; एक ठार, दोघे गंभीर

कारवाई झाल्यास नोकरी जाईल या भीतीने वाहकाने यातील २८ हजार रुपये व्यवस्थापकाला दिले. उर्वरीत ७ हजारासाठी वारंवार तगादा लावल्यावर फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाने रचलेल्या सापळ्यात आरोपी वानेरे व सावरकर या दोघांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. शहरातील खामगाव मार्गावरील एका पतसंस्था नजीक ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… नागपुरात सोन्याच्या दरात उसळी.. आजचे हे आहेत दर

एसीबी च्या पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन इंगळे, मो. रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, रवींद्र दळवी, शेख अर्शद, गजानन गालडे, स्वाती वाणी, सुनील राऊत यांनी ही कारवाई केली.