अमरावती : कर्मचारी निवड आयोगाकडून (स्टाफ सिलेक्शन कमिशन) सन २०२४-२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी सविस्तर वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असे आहे वेळापत्रक : एप्रिल-मे २०२४ : ग्रेड ‘सी’ स्टेनोग्राफर . लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह परीक्षा, जीएसए/एलडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह परीक्षा, एसएसए/ यूडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिव परीक्षा, निवड पोस्ट परीक्षा फेज (१२)
हेही वाचा – नागपूर : ‘सिस्टीक फायब्रोसिस’चे निदान मुलांच्या घामातून शक्य; दिल्ली एम्सकडून मदत मिळणार
हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचे ‘टेलिग्राम चॅनल’; कारवाईबाबतची माहिती प्रसारित केली जाणार
मे-जून २०२४ : दिल्ली आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा, कनिष्ठ अभियंता परीक्षा
जून-जुलै २०२४ : एकत्रित उच्च . माध्यमिक स्तर परीक्षा, मल्टी टास्किंग (नॉनटेक्निकल) परीक्षा
सप्टेंबर २०२४ : संयुक्त पदवी स्तर परीक्षा
ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४: स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा
डिसेंबर २०२४ – जाने. २०२५ : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल आणि आसाम रायफल्सच्या रायफल मॅन परीक्षा.