वर्धा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या शालेय शिक्षण खात्यंतर्गत व्यासपीठाणे एक उपक्रम पुरस्कृत केला आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी हा उपक्रम अंमलात येत आहे. अनुभवात्मक शिक्षण हा मुख्य हेतू आहे. वर्ग तिसरा ते आठवीच्या विद्यार्थी शिक्षकांसाठी राज्यपातळीवर आयोजित रंगोत्सव उपक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व एकता या भावनांची जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे. समृद्धी उपक्रम नववी ते बारावी वर्गाच्या स्तरावर आयोजित होणार.
रंगोत्सवात अनुभवात्मक अध्ययन आधारे कृती राज्यस्तरावर सादर करायची आहे. माध्यमिक स्तरावर राष्ट्रीय पातळीवर कला उत्सव कार्यक्रम आहे. शिक्षकांना अभ्यासक्रमच्या क्षेत्रात सर्वोत्तम कला एकात्मिक अध्ययनशास्त्रीय पद्धती यावर आधारित अध्ययन व अध्यापन कृती सादर करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर जिल्हानिहाय प्राप्त कृती व्हिडीओचे परीक्षण करून रंगोत्सव कार्यक्रमाचे ५ तर समृद्धी कार्यक्रमाचे ३ कृती व्हिडिओ सादर करावे लागणार. त्याचे विभागीय स्तरावर परीक्षण होणार. रंगोत्सव उपक्रमात विभागीय पातळीवार प्रत्येक विभागातून ३ उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ तसेच समृद्धी उपक्रमात एक उत्कृष्ट संघ निवडल्या जाणार. रंगोत्सव उपक्रमात राज्य पातळीवर आठ विभागातील २४ संघांना कृती सादरीकरणासाठी आमंत्रित केल्या जाणार आहे. तर समृद्धीचे आठ संघ सहभागी होतील. राज्यस्तरावर निमंत्रित रंगोत्सव व समृद्धी उपक्रमातील संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे केल्या जाणार आहे. रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाचे आयोजन ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी होत आहे. समृद्धी उपक्रमात राज्यस्तरावर उत्कृष ठरणाऱ्या संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. रंगोत्सव उपक्रम राज्यापुरताच मर्यादित आहे. रंगोत्सव उपक्रमात काही बाबी विचारात घेतल्या जाणार. अनुभवात्मक शिक्षणाच्या आधारे शालेय विद्यार्थ्यात सहयोग, स्वयं पुढाकार, स्वयं दिशा, स्वयं शिस्त, संघ भावना, जबाबदारी, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे.
हेही वाचा…पंतप्रधानांसाठी संमेलनाचे उद्घाटनस्थळ बदलणार? उद्घाटन विज्ञान भवनात, संमेलन तालकटोरा मैदानात
तर समृद्धी उपक्रम राष्ट्रीय पातळीवर प्रथमच आयोजित केल्या जात आहे. त्यात अध्यापनशास्त्र महत्वाचे आहे. वर्गातील उपक्रम व कृती याचा अध्ययनाशी थेट संबंध असला पाहिजे. अध्ययन अनुभवात चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचा पण विचार व्हावा. याखेरीज अन्य विविध वैशिष्ट्ये आहेत.