यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. आधीच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ, डिझेल महागल्याने शेतीच्या मशागतीचा वाढलेला खर्च आणि आता महाबीजचे बियाणे देखील अपेक्षेहून जास्त महाग झाल्याने शेतकऱ्यांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मारायचे ठरवले आहे का, असा सवाल भाजपचे नेते व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनच्या बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. महाबीजची सोयाबीनची ३० किलोची बॅग ही साधारणपणे २२५० रुपयांपर्यंत मिळत होती, यंदा हीच बॅग २ हजार रुपयांनी महाग झाली असून या बॅगसाठी शेतकऱ्यांना आता ३९०० ते ४३५० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या हंगामात काढणीदरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते, त्यामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. बियाणे मिळविण्यासाठी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला गेला. अतिउष्णतेमुळे या उन्हाळी हंगामातूनही अपेक्षित सोयाबीन मिळू शकले नाही. परिणामी महाबीजचा सोयाबीन बियाणे पुरवठा कमीच राहणार आहे. सोयाबीनचे वाढलेले भाव, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतुकीचा खर्च असे विविध‍ प्रकारचे वाढीव खर्च पाहता सोयाबीन बियाण्यांची दरवाढ अपरिहार्य होती, असे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगून दरवाढीचे समर्थन केले असले तरी यावर आक्षेप घेत डॉ. बोंडे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल