राज्यातील बऱ्याच भागात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पून्हा पावसाचा जोर वाढतांनाचे चित्र आहे. दरम्यान आजपर्यंतच्या पावसामुळे राज्यातील कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग केला याची माहिती शासनपातळीवरून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील विविध धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर विभागात लागू केलेली ‘ई-पंचनामा’ प्रणाली काय आहे ?

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स,  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून ५२८ क्युमेक्स, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून २३.७० क्युमेक्स विसर्ग, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून  ३५.४० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले आहे.  सातारा जिल्ह्यातील  बलकवडी धरणातून ५५ क्युमेक्स, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स.  अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून  आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स,यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणातून  ४० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणातून  १९.५० क्युमेक्स  वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणातून  १७.२५ क्युमेक्स,सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून  १६९ क्युमेक्स पाणी  सोडण्यात आल्याचे मंत्रालय मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे.