बुलढाणा: ओबीसी मुक्तीचा ऐतिहासिक जाहीरनामा असलेला मंडल आयोग लागू करण्याची घोषणा ७ ऑगस्ट १९९० रोजी लोकसभेत करण्यात आली. या दिवसाला उजाळा देण्यासाठी समस्त ओबीसी समाजबांधवांनी राज्यभरात मंडल दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, नागपूर विभागीय अध्यक्ष निवृत्ती तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुनील शेळके म्हणाले, ७ ऑगस्ट मंडल दिनाला उजाळा दिला. राज्यातील जिल्हा शाखांनी शासकीय व निमशासकीय सेवेत निवड झालेले ओबीसी उमेदवार, विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

state government announced Parashuram Economic Development Corporation electing Ashish Damle president
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Maharashtra State Government opinion in High Court regarding appointment of MLA print politics news
स्थगिती नसल्यानेच आमदारांच्या नियुक्त्या; राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
seven MLA, High Court, Maharashtra Government,
स्थगिती नसल्यानेच सात आमदारांच्या नियुक्त्या, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

हेही वाचा – गोंदियातील भात रोवणी अंतिम टप्प्यात; ८६.४७ टक्के क्षेत्रात पेरणी

हेही वाचा – कोल्हापूरमधील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प कार्यान्वित, किती शेतकऱ्यांना लाभ पहा…

धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी यांच्या अपघाती निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार, वाशीम जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर, धुळे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, जालना जिल्हाध्यक्ष सुधाकर चिंधोटे, भंडारा जिल्हा प्रभारी दामोदर दहले, नाशिक जिल्हा प्रभारी नंदकिशोर पांचपुते, नंदुरबार जिल्हाप्रभारी रवींद्र देवरे, राज्य महासचिव राम वाडीभस्मे, संजय खांडवे, विठ्ठल इंगळे, मुरलीधर टेकाळे यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.