नागपूर : प्रेमप्रकरणात प्रियकरावर किंवा लग्नानंतर पतीवर महिलांचा प्रगाढ विश्वास असतो. तरीही पतीचे अनैतिक संबंध किंवा प्रियकराचे दुसरीकडे प्रेमसंबंध आहेत का? याबाबत माहिती करून घेण्यात महिलांची उत्सुकता असते. अशी ऑनलाईन हेरगिरी करण्यात भारतीय महिला तिसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर रशिया तर दुसऱ्या स्थानावर ब्राझिल देशाचा क्रमांक लागतो, अशी माहिती सायबर सुरक्षेसंबंधित एका संकेतस्थळाने घेतलेल्या ‘स्टेट ऑफ स्टॉकवेअर’ अहवालातून समोर आली.

पती-पत्नीचे नाते विश्वासावर टिकून असते. त्यामुळे लग्नानंतर पतीने एकनिष्ठ असणे गरजेचे असते. मात्र, अनेक महिला लग्नानंतर पतीवर अविश्वास करतात. त्यामुळे लग्नानंतर पतीचे कुठे अन्य महिलेशी अनैतिक संबंध आहेत का? याबाबत हेरगिरी करण्यात काही महिलांना उत्सूकता असते. तसेच प्रियकर आणि प्रेयसींमध्ये विश्वासाचे नाते असल्यानंतरही प्रेयसी किंवा प्रियकर एकमेकांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहत असतात. प्रियकराचे कुण्या अन्य तरुणीशी प्रेमसंबंध आहेत का? याबाबत जाणून घेण्याची उत्सूकता असते. तसेच जर लग्नानंतर पतीचे विवाहबाह्य संबंध असतील आणि पती त्याबाबत मान्य करीत नसेल तर पतीच्या प्रेमसंबंधाबाबत जाणून घेण्यासाठी महिला आटापीटा करीत असतात. पतीच्या किंवा प्रियकराच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर अॅप ‘इंस्टॉल’ करून हा सर्व प्रकार करता येतो. त्यासाठी महिला-तरुणी थेट सायबर तज्ञाची मदत घेतात तर अॅप डाऊनलोड करून स्वतः माहिती घेत असतात. जगभरात सायबर सुरक्षेसंबंधित एका संकेतस्थळाने ‘स्टेट ऑफ स्टॉकवेअर’ अहवाल तयार केला आहे. त्यात रशियामधील सर्वाधिक ९ हजार ८०० मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर आढळला तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझिलमध्ये ४ हजार १८६ मोबाईलमध्ये स्पायवेअर इंस्टॉल असल्याची माहिती समोर आली. तसेच भारताचा क्रमांक तिसरा असून २ हजार ४९२ मोबाईलमध्ये स्पायवेअर असल्याचे आढळून आले. पती किंवा प्रियकराची हेरगिरी करण्यात भारतातील महिलांचा मोठा सहभाग आहे. या हेरगिरीतून अनेकांचे संसार तुटले असून अनेकांचे आयुष्याची दिशा बदलली आहे.

हेही वाचा : गडचिरोली : भूमाफियांच्या इशाऱ्यावर बनवला विकास आराखडा, अवैध भूखंडातून माफियांची शेकडो कोटींची कमाई

काय आहे स्पायवेअर?

अॅपच्या माध्यमातून किंवा लिंकच्या माध्यमातून मोबाईलमध्ये स्पायवेअर ‘इंस्टॉल’ केल्या जाते. त्यानंतर मोबाईलवर येणारे टेक्स्ट मॅसेज, व्हॉट्सअॅपवर येणारे मॅसेज, फेसबुकवरील लाईक्स-कमेंट्स आपोआप दुसऱ्याला दिसू लागतात. तसेच मोबाईलचे लोकेशन आणि मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र, चित्रफिती, इतरांना पाठवलेले छायाचित्र आणि कॉल रेकॉर्ड्सची सुद्धा माहिती दुसऱ्याकडे जाते.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत फटका बसताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कोविड भत्त्याची आठवण! संघटना म्हणतात…

होऊ शकतो संसार उद्धवस्त

कुणीही एका जोडीदाराने जर मोबाईलमध्ये स्पायवेअर टाकून हेरगिरी केल्यास विश्वासाचे नाते संपते. स्पायवेरमधून मिळालेल्या माहितीनंतर संसार तुटू शकतो. मित्र किंवा मैत्रिणीने हा प्रकार केल्यास त्यांचे नातेही संपण्याच्या स्थितीत असते. त्यामुळे स्पायवेअर इंस्टॉल न करण्याचा सल्ला सायबर तज्ञ देतात.

मोबाईलमध्ये स्पायवेअर टाकण्याचे प्रकार घडत असतात. कुणीतरी ओळखीचाच व्यक्ती असा प्रकार करतो. जर मोबाईलमध्ये स्पायवेअर असल्याचा संशय असल्यास मोबाईलमध्ये शोधून तो अनइंस्टॉल करावा किंवा थेट मोबाईल फॉरमॅट करावा.

निमित गोयल, पोलीस उपायुक्त (गुन्हे आणि सायबर विभाग)