लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : आगामी लेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्याशी संवाद साधला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, आमदार प्रवीण दटके, डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या दृष्टीने काम केले असून विविध राजकीय पक्षाचे नेते भाजप नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ प्रमुखाला आपआपल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान ५० पदाधिकांऱ्यांचा आपल्याला पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा-सत्ताधारी आमदाराला धमकी, पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई; आमदार अमोल मिटकरी म्हणतात…

राज्यात ४८ लोकसभा मतदार संघात आपण दोन तीन लोकसभा मतदार मिळून १५ क्लस्टर तयार केले आहे. या ठिकाणी केंद्रीय नेतृत्व जाऊन मेळावे घेत आहेत. लोकसभा निवणुकीच्या दृष्टीने मतदार याद्या प्रत्येकाला मिळाल्या आहेत त्यामुळे बुथ प्रमुखाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. प्रत्येकाक़डे देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करायची आहे. मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावा. आपल्या गळ्यातील दुपट्टा हेच आपल्यासाठी प्रमाणपत्र आाहे. पक्षावर किंवा नेत्यावर नाराज होऊन काही उपयोग नाही. आपण नाराज असाल आणि काम करत नसेल तर आपली जागा दुसरे कोणी तरी घेईल असेही बावनकुळे म्हणाले. . प्रत्येक आमदाराने १५ हजार तर खासदारांनी ३० हजार लोकांपर्यत नमो ॲप पोहचवायचे आहे असेही बावनकुळे म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State president chandrasekhar bawankules appeal to office bearers says finish small parties and bring office bearers to bjp vmb 67 mrj
Show comments