नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पनवती अशी टीका करणे हे जनतेला आवडले नाही त्यामुळे या निकालामुळे देशात खरा पनवती कोण आहे हे मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीनही राज्यातील निवडणुकांनी दाखववून दिले असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाला तीनही राज्यात मिळालेल्या यशानंतर नागपुरात पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोश केल्यानंतर बावनकुळे प्रसार माध्यमाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाषणातून पंतप्रधानात नरेंद्र मोदी यांचा पनवती असा उल्लेख केला आणि जनतेला पटले नाही. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली आहे आणि छत्तीसगढ आणि राजस्थान हे राज्य काँग्रेसकडून भाजपने खेचून आणले आहे. त्यामुळे या देशात खरा पनवती कोण हा जनतेने दाखवून दिले आहे असे सांगत बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसचा विजय झाला की ईव्हीम मशीन चांगल्या आहेत आणि भाजपचा विजय झाला तर मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत असले तरी त्यांची ही पळवाट आहे.

हेही वाचा… तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाने माणिकराव ठाकरे यांचे राजकीय वजन वाढले

तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी झाली तर त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन घोळ केला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशाचा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्यामुळे तीनही राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये आदिवासीसह सर्वच समाजाने विश्वास दाधविला आहे. काँग्रेसने ६५ वर्षात अनाचार, अत्याचार आणि गरीबांच्या कल्याणासाठी काही केले नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या कामाचे हे यश आहे. देशाला मोदी यांचे नेतृत्व मान्य आहे हे यावरुन सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात सुद्धा असेच वातावरण आहे. जसा विजय तीन राज्यात झाला आहे तसाच महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील आणि लोकसभा निवडणुकीत ४५ वर आणि विधानसभा निवडणुकीत २५० च्या वर महायुतीचे उमेदवार निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेष आहे असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State president chandrashekhar bawankule criticised rahul gandhi after the bjp victory in all three states vmb 67 dvr