कसब्याच्या जागेवर आम्ही का पराभूत झालो याबाबत आम्ही आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. चिंचवडची निवडणूक आम्ही जिंकलो. मात्र कसबात पराभव झाला. राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे तेथील विकास आम्ही करणार आहे करु, असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा- चंद्रपूर: महिलेवर हल्ला करणारा बिबट अखेर जेरबंद
निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपाचे बावनकुळे यांनी खंडण केले. अजित पवार यांनी निवडणुकीच्या आधी व्हिडियो दाखवायला पाहिजे होते. निवडणुकी नंतर दाखविण्याचे कारण काय हे मला समजले नाही. मुळात आमची परंपरा पैसा वाटून मत मागायची नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसा पासून सत्ता हे केवळ महाविकास आघाडीचे काम असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा- भाजपचे ‘डिव्हाईड ॲन्ड रूल ” सूत्र एका ठिकाणी यशस्वी; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर ११ हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजपा उमेदवाराचा पराभव केला.