नागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२३ ला प्रकाशित केली होती. मात्र मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती. अखेर आयोगातर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४साठी उमेदवाचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीतील खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती. त्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्रे वितरित करण्यात आलेली होती. मात्र, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला उमेदवारांना जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या परिक्षेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ ऑगस्टची परीक्षा रद्द झाली होती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षण पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर एक डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांच्या मैत्रीचे पर्व

परीक्षेला जाण्यापूर्वी हे नक्की वाचा

एमपीएससीने १ डिसेंबरच्या परिक्षेबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी किंवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात एमपीएससीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – नागपूर: हिंगण्यातील अपघातग्रस्त बसचे दोन्ही आपत्कालीन द्वार बंद, निरीक्षणात…

असे मिळवा प्रवेशपत्र

परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेवेळी उमेदवारांनी एमपीएससीच्या मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. एमपीएससीकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची, प्रचलित नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State services pre exam mpsc delay maratha reservation agriculture issue when will the exam be held dag 87 ssb