गोंदिया : विदर्भातील गोंदिया जिल्ह्यांमध्ये राज्य पर्यटन विकास महामंडळाने सूसज्ज असे ज्ञपर्यटक उभारले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी रोजी मुंबईतून आभासी पद्धतीने त्याचे उद्घाटन केले. पर्यटक निवासातील सुविधा नवेगावबांध या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून २१ कोटीच्या निधीतून पर्यटक निवास बांधले आहे. येथे विशेष सूट, डीलक्स सूट, स्टॅंडर्ड सूट आणि ८ खाटांची डॉर्मिटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.येथे एकूण डिलक्स १८ सुट , महिलांसाठी डॉरमेटरी सुट,जेन्ट्स डॉरमेटरी १ सूट,१ चेंजींग रूम, वेटींग रूम आहे.

नवेगाव बांध पर्यटकांचे आकर्षण केंद्र

इटियाडोह धरण हे गोंदिया, भंडारा गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेला हा पाटबंधारे प्रकल्प मोरगांव अर्जुनी तालुक्यात आहे. कटला मासा व कोळंबीसाठी हा प्रकल्प प्रसिध्द आहे. तिबेटिया कारपेट बनविण्याचे केंद्र येथून जवळच आहे. तसेच तिबेटी कॅम्प, गोठनगाव हे मोरगांव अर्जूनी तालुक्यातील नवेगांव बांधजवळून १० कि.मी. अंतरावर व प्रतापगड तिर्थस्थळापासून ३ कि.मी. अंतरावर जगप्रसिध्द मोठा जलाशय आहे. येथे तिबेटी व बंगाली लोकांचे कॅम्प आहे.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

हेही वाचा…“मरणारा शेतकरी हिंदू नाही का?”, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक; अमरावतीत मोर्चा

नागझीरा अभयारण्याचे क्षेत्रफळ १५२.८१ चौ.कि.मी. असून यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३५ प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलात प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी पक्षी आढळतात. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्टया महत्वाची सुमारे २०० प्रकारचे वृक्ष तसेच पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी अभयारण्यामध्ये एक वस्तू संग्रहालय आहे.

हेही वाचा…नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…

प्रतापगड गाव

प्रतापगड गाव डोंगर परिसरात हा उभा असलेला ऐतिहासिक किल्ला, शिवतीर्थ, मोरगांव-अर्जूनी तालुक्यातील प्रसिध्द यात्रास्थळ आहे. गोंदिया जिल्हयातील सर्वात मोठे यात्रास्थळ आहे. पर्वतावर असणारा दर्गा आणि शिवमंदिर आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराला डोंगरराजाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ५० कि.मी. लांब भुयार सहानगड किल्ला (सानगडी पर्यंत) आहे. येथून हे सर्व स्थळे सहजपणे भेट देता येतात आणि प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना निसर्गाची अप्रतिम सुंदरता अनुभवायला मिळते.

Story img Loader