गोंदिया :- राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून प्रवास करणे आता धोक्यापासून मुक्त होताना दिसत नाही. एसटी बसेस मार्गावर कुठेही बिघाड होणे हे आता जणू काही दररोजचेच झाले आहे. कोहमारा-गोंदिया मार्गावरील खजरी डव्वा गावाजवळ २९ नोव्हेंबर रोजी एसटी शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त आणि सुरक्षित वाहतुकीची हमी देणाऱ्या एसटी ची बसेस भंगार अवस्थेत असल्या, तर सुरक्षित प्रवासाची हमी कोण देणार? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार या आगारात सध्या एकूण ७० प्रवासी बसेस आहेत. त्यापैकी १३ बसेस २०१५ मध्ये त्यांच्या सेवेची १५ वर्षे पूर्ण करतील. म्हणजेच ते भंगारासाठी योग्य होईल. तर गेल्या ५ वर्षांपासून गोंदिया आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अशा स्थितीत जुन्या बसेसनेच वाहतूक चालवावी लागत असून कर्मचाऱ्यांची ही मोठी कमतरता आहे. प्राप्त माहितीनुसार, गोंदिया आगारात चालक व वाहकांची एकूण २४८ पदे मंजूर आहेत.मात्र सध्या केवळ २०५ कर्मचारी कर्तव्यावर आहेत. यामध्ये ८३ चालक, ६२ वाहक आणि ५९ चालक सह वाहक आहेत. आगारातून बाहेर पडण्यापूर्वी एसटी बसेसची नियमानुसार कसून तपासणी केली जाते.मात्र गोंदिया आगारात यांत्रिकी (मेकॅनिक) कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यात ही यांत्रिकी महिला कर्मचारी रात्री ड्युटीवर नसतात. तर बहुतांश बसेस आपला दिवसभरचा प्रवास पूर्ण करून रात्रीच्या वेळीच आगारात येतात. अशा स्थितीत पुरेशा प्रमाणात देखभाल दुरुस्ती अभावी सातत्याने बसेसमध्ये बिघाड होतच असतात.काही प्रसंगी तर एसटी बसेसची अवस्था बिकट झाल्याने त्या वेळेवर रद्द ही केल्या जातात.
हेही वाचा >>>यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
बस ३ किमी प्रवास केल्यानंतर झाली निकामी
बुधवार ४ डिसेंबर रोजी गोंदियाहून सालेकसा मार्गे आमगावकडे जाणारी बस क्र. एम.एच.०७/सी -९४५३ ही डेपोपासून गोंदिया शहरातील जयस्तंभपर्यंत जेमतेम तीन किलोमीटरवर पोहोचली आणि निकामी झाली. तोपर्यंत वाहकाने अनेक प्रवाशांची तिकिटे ही कापली होती. ही बस नंतर पुन्हा आगारात नेण्यात आली आणि ज्या प्रवाशांनी तिकीट काढले होते त्यांनाही खाली उतरवण्यात आले. नंतर कळलं की दुसरी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी ३ डिसेंबर रोजी गोंदिया हून सालेकसा मार्गे आमगावकडे जाणारी बस क्र.एम.एच.४०/एन -८७०५ ही खमारी गावाजवळ आली असता निकामी झाली असता प्रवाशांना तिथच उतरवून एका तासानंतर पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये व्यवस्था करण्यात आली. दरम्यान प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कोणालाही घेणे देणे नाही.
दररोज १८ हजार प्रवासी करतात प्रवास
गोंदिया आगाराच्या बसेसच्या दररोज ३७५ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३३६ ते ३४० फेऱ्या दररोज चालतात. आगाराला प्रवाशांकडून दररोज ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रवाशांना प्रथमोपचार करता येईल. त्याचप्रमाणे वाहनांमध्येही अग्निशमन यंत्रे असणे आवश्यक आहे. मात्र येथे सुविधा तर दूरच, प्रवासी उपयोग करतात त्या सीट ही फाटलेल्या असतात. आरटीओच्या नियमानुसार बसमध्ये प्रवाशांना बसता येते आणि जास्तीत जास्त १० प्रवासी उभे राहू शकतात. मात्र प्रत्यक्ष पाहिल्यास बसेस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसून येतात.
हेही वाचा >>>आशिया, सायबेरिया, मंगोलियाचे ‘पाहुणे’ उतरले चंद्रपुुरात…चक्क हिमालय पर्वत ओलांडून…
शिवशाही बस अपघाताची चौकशी सुरू
२९ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा-गोंदिया रस्त्यावर नागपूरहून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या भंडारा आगाराच्या शिवशाहीला अपघात झाला. या अपघातात ११ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. हे पाहता या प्रकरणाच्या तपासाबाबत शासन आणि परिवहन विभाग दोघेही गंभीर असल्याचे दिसत आहे. या अपघाताच्या थर्ड पार्टी तपासासाठी एका स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, ही संस्था अपघातस्थळी जाऊन अपघाताशी संबंधित सर्व तपशीलांची तपासणी करेल. बसचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
परंतु भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या अपघातांमागची खरी कारणे जाणून घेऊन त्यावर उपाय योजना केल्यास भविष्यात असे अपघात टाळण्यास मदत होईल. त्यापेक्षा अपघाताची जबाबदारी निश्चित करणेही शक्य होणार आहे. या दृष्टीने परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या अपघाताची विभागीय चौकशी तसेच स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गोंदियाचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम तिवसकर यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर रोजी तपासासाठी तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये दोन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांचे तपास अहवाल लवकरच येणे अपेक्षित आहे. दोन्ही समित्या आणि स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल संयुक्तपणे परिवहन आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.