आपल्या विविध मागण्यांसाठी ‘कॉस्ट्राईब’ कर्मचारी महासंघाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यातही जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, मागासवर्गीय पदोन्नती व सरळ सेवेतील अनुशेष भरण्यात याव्या, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करावी, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>रेल्वे प्रवाशांवर तिप्पट भार; मुंबई एक्‍स्‍प्रेसच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय, ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा

आज शुक्रवारी आयोजित आंदोलन जिल्हाध्यक्ष सुभाष डोंगरदिवे, राज्य उपाध्यक्ष अविनाश वाकोडे, मुख्य सचिव बी. डी. धुरंधर, आय. टी. इंगळे, शेषराव वाकोडे, अशोक हिवाळे, जी एस वाघ, कैलास तेलंग, अशोक दाभाडे, प्रशांत बोर्डे, डी एस गवई, अरुण सावंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.