चंद्रपूर : शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’चे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, यूएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी आता ‘हायटेक’ ,तीन टक्के बोनसही; वाचा कसा लाभ घेता येणार?

लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण या पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे राज्यपाल म्हणाले.याप्रसंगी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. संचालन रेणुका देशकर, तर आभार विलास नानीवाडेकर यांनी मानले.

 मुनगंटीवार यांची  त्रिसूत्री

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन आमदार मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, ‘सी’ फॉर चंद्रपूर, ‘सी’ फॉर ‘क्लायमेट चेंज’च्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खूप झाल्या चर्चा; आता कृती हवी’

परिषदेत फक्त भाषण ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होईल. चिंता व्यक्त होईल. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये,  उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. जेव्हा ‘क्लायमेट चेंज’चा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात चंद्रपूरचे नाव असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement by governor c p radhakrishnan on environmental conservation through education rsj 74 amy