नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश कांग्रेस च्या कार्यकारिणीच्या महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली बैठक आज अमरावतीत होत आहे. यासाठी कांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी बरमेश चेन्निथला आले आहेत.
ते म्हणाले, काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी, शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचे आयोजन केले आहे. पहिल्यांदा आदिवासी भागांमध्ये, गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत. नागपूरला किंबहुना शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत. राजकीय पक्षात आम्ही पक्ष आणि सत्तेसाठी लढत नाही. एक आदर्श आणि विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. पण काही लोकांना पद नसले की ते लोक निघून जातात. जाणाऱ्यांमुळे काँग्रेस पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. काँग्रेसला सोडून कोणी जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी लवकर जावं, मात्र माझा विश्वास आहे की कोणी जाणार नाही. सुरज चव्हाण यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना सीबीआय, ईडीचा दुरुपयोग होत आहे. या सरकारच्या काळात भाजपच्या कोणत्या नेत्याच्या घरावर धाडी घालण्यात आल्य काय ? भाजपमधील कोणाला अटक झाली का? कारण भाजप विरोधकांवर ईडी, सीबीआय लावून काम करत आहे.
हेही वाचा >>>रविकांत तुपकर भूमिगत! निवासस्थानी बंदोबस्त; उद्या रेल्वे रोको आंदोलन
विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी यावेळी सरकार स्थापन करेल. राम मंदिराच्या निमित्ताने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सुरू आहे असा आरोपही चेन्निथला यांनी केला.जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसांत कोणाला किती जागा दिल्या जातील? यावर शिक्कामोर्तब होत निवडणुकांना पुढे जाऊ. येणाऱ्या दिवसांत जागावाटप अंतिम यादी जाहीर करू, असे रमेश चेन्निथला म्हणाले.