महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: जगातील २१० देशांमध्ये १ कोटी ३४ लाख ५१ हजार ६५४ अनिवासी भारतीय आणि १ कोटी ८६ लाख ८३ हजार ६४५ भारतीय वंशाचे असे एकूण ३ कोटी २१ लाख ३५ हजार २९९ भारतीय राहतात. त्यापैकी ६९ टक्के नागरिक हे ९ देशात असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.
सर्वाधिक परदेशी भारतीय राहणाऱ्या देशांमध्ये अमेरिका (यूएसए), ब्रिटेन (यूके), संयुक्त अरब अमिराती (यूएई), दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, कॅनडा या नऊ देशांचा समावेश आहे. येथे जगभरातील एकूण परदेशी भारतीयांपैकी तब्बल ६८.७८ टक्के भारतीय राहतात. अमेरिकेत सर्वाधिक ४४ लाख ६० हजार परदेशी भारतीय राहतात. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारातून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून हा तपशील मिळवला आहे.
चीनच्या हाँगकाँगमध्ये सध्या ३८ हजार ७२९ परदेशी भारतीय तर चीनच्या (रिपब्लिक ऑफ तायवान) येथे ३ हजार ४४६ परदेशी भारतीय राहतात. रशियन फेडरेशन देशात सध्या २३ हजार ५९० आणि युक्रेनमध्ये ४२२ भारतीय वंशाचे व्यक्ती राहत असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
सर्वाधिक भारतीयांचे वास्तव्य असलेले देश…
स्त्रोत: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (मार्च २०२३)