बुलढाणा : घरची परिस्थिती जेमतेम, तरीही डॉक्टर होण्याचा निर्धार केलेला. यामुळे शिक्षकाच्या घरी राहून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत ‘नीट’ परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. स्थानीय भारत विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी ‘नीट’मध्ये सुयश प्राप्त केले. खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत भारत शाळेचे करण राजपूत (५८४ गुण), अतुल गवई (५५८ गुण), ऋषिकेश मनझरटे (५५४ गुण), आर्यन गर्गे (५४८ गुण) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ते आता वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत. भारत शाळेतील शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब ठरली.
अडचणीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी मदत करणाऱ्या संजय देवल या शिक्षकांनाही यामुळे मोठा आनंद झाला. कारण वरील गुणवंतातील करण राजपूत व ऋषिकेश मनझरटे हे ११वी आणि १२ वी ‘नीट’ करत असताना त्यांच्या घरी रहात होते. त्यांचे प्रोत्साहन, सहकार्य व अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.