वर्धा: अपघातांमुळे वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग आता वेगळ्या कारणाने कलंकित होत आहे. मार्गालगत असणाऱ्या परिसरातून चक्क जनावरांची चोरी होवू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून पशुधन चोरीचे प्रमाण लक्षणीय वाढत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले होते. तेव्हा या चोऱ्या प्रामुख्याने समृद्धीलगत असणाऱ्या गावात होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात चमू गठित केली. मार्गावर गस्त वाढविण्यात आली. जालना ते नागपूर या पट्ट्यातील टोल नाक्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातूनच चोरट्यांचा छडा लागला.

हेही वाचा… VIDEO: धुक्यात हरवले चिखलदरा आणि पर्यटकही

सहाच्या टोळीने बैल व अन्य जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. जनावरे चोरून ती वाहून नेण्यासाठी मोठ्या वाहनांचा उपयोग केल्या जात होता. त्या वाहनांसह जनावरे विक्रीतून आलेला पैसा असा एकूण तेरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय चौधरी, अतुल चौधरी भिवापूर, गुंदेराव दाडमल, कुंदन गोयल, सुनील सवसाखले, स्वप्नील आत्राम पवनी यांना अटक झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stealing of animals has started in the area along samruddhi highway pmd 64 dvr
Show comments