अल्पवयीन मुलगा बाराव्या वर्गात शिकतो. आई वडिलांना एकुलता एक. त्याचे एका तरूणीवर प्रेम आहे. परंतु, तिला ऐशोआरामात जगण्याची सवय. तिच्यावर खर्च करण्यासाठी तो खूप आटापीटा करीत होता. मात्र, तिच्यावर खर्च करण्यास पैसे नसल्यामुळे तो वाईट संगतीत पडला.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून धक्कादायक माहिती
त्याने पहिल्यांदा कळमना बाजारातून एक दुचाकी वाहन चोरले. पहिल्या चोरीत यशस्वी झाल्यानंतर त्याची हिंमत वाढत गेली आणि हळू हळू त्याने १८ दुचाकी वाहन चोरले.आरोपी विकास बोपचे गॅस कंपनीत चालक म्हणून कामाला आहे. अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या वाहनाची स्वस्तात खरेदी करायचा. चालकाचे काम करीत असताना तो वाहन विक्री करीत असल्याचे लोकांना सांगायचा. गरजुंना परवडेल अशा किंमतीत वाहन मिळत असल्याने लोक विकासकडून वाहन खरेदी करू लागले. कागदपत्रेही बनवून देतो अशी बतावणी तो करायचा.
दरम्यान, कळमना बाजारातून वाहनांची चोरी वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. पोलिसांनी महिनाभर पाळत ठेवली. मात्र, चोराचा काहीचा सुगावा लागला नाही. अल्पवयीन आणि आरोपी विकास हा वाहन चोरीसाठी आला. वाहनाला किक मारून घेवून जात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वाहन चोरीचा भंडाफोड झाला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनोद पाटील यांच्या पथकाने केली.