महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर: उपराजधानीत आयोजित जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात २१ आणि २२ मार्च रोजी जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला विविध देशातील सुमारे ६० तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून २५० असे एकूण ३०० पाहुणे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर महापालिकेसह शासनाच्या विविध विभागाकडून रस्त्यांवर आकर्षक रोषणाई व सौंदर्यीकरण केले जात आहे. परंतु वर्धा रोड, सिव्हिल लाईन्स परिसरात आकर्षक रोषणाईसाठी थेट महावितरणच्या वीज वितरण पेटीत तार जोडून नियमबाह्य वीज घेतली आहे.

आणखी वाचा- नागपूरच्या मेट्रो स्थानकावर जी-२० ची १३० फूट रुंद प्रतिमा, देशातील एकमेव असल्याचा दावा

काही ठिकाणी नागपूर महापालिकेच्या पथदिव्याला जोडून नियमबाह्य वीज घेतली आहे. पथदिव्याची वीज महापालिकेला ७.५१ रुपये प्रतियुनिट या सवलतीच्या दरात मिळते. तात्पुरते मीटर घेतल्यावर वीज सुमारे १३ रुपये युनिट दराने घ्यावी लागते. त्यामुळे या पद्धतीची जोडणीही नियमबाह्य असल्याचे वीज क्षेत्रातील जाणकार सांगतात.

महावितरणच्या सूचनेकडे दुर्लक्ष

हा गैरप्रकार बघून महावितरणने काही ठिकाणी वीज खंडित केली. सोबतच तात्पुरती जोडणी घेण्याचीही सूचना केली. त्यानंतरही बऱ्याच भागात चोरीची वीज वापरली जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्याच्या पुढील वीज वितरण पेटीतूनही रोषणाईसाठी अशीच वीज चोरी सुरू आहे.

अधिकारी म्हणतात…

सिव्हिल लाईन्सच्या काही भागात रोषणाईसाठी घेतलेली वीज अनधिकृत आढळल्यावर तातडीने ती खंडित करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना येथे तात्पुरती जोडणी घेण्याची सूचना केली, असे महावितरणच्या सिव्हिल लाईन्स येथील उपविभागीय अधिकारी नितीन उज्जैनकर म्हणाले. नागपूर महापालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी वाचा- बुलढाणा: ‘देवेंद्र अंकल ऐकाना… माझ्या पप्पांना जुनी पेंशन द्याना’; संपकऱ्यांच्या वाहन रॅलीतील बालकाने वेधले लक्ष

१२ ठिकाणी वीज जोडणी दिल्याचा महावितरणचा दावा

जी- २० साठी गेल्या दोन दिवसांत धरमपेठ भागात २, सदर भागात २, सोमलवाडा भागात ५, अजनीत ३ अशा एकूण १२ तात्पूरत्या जोडण्या दिल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. ‘लोकसत्ता’ने एका अधिकाऱ्याला याबाबतच्या माहितीसाठी संपर्क केल्यावर वीज जोडण्या दिल्याची सूत्रांची माहिती आहे.