लोकसत्ता टीम

अकोला: शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांची तोडफोड झाली. त्यात चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दंगलीतील अनेक लोकांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमातील पोस्टवरून दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील लोकांचा मोठा जमाव चालून आला. रात्री उशिरापर्यंत दगडफेक होऊन हरिहर पेठ भागात चारचाकी, रिक्षा, दुचाकी वाहनांची तोडफोड अन् जाळपोळ केली.

आणखी वाचा- गडचिरोली: कळपातून भरकटलेल्या रानटी हत्तीचा जारावंडीत धुडगूस

परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच रात्री भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल तसेच जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीवर तात्काळ नियंत्रित मिळण्यात यश यावे, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिल्या.

जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांकडून जमावांवर अश्रूधुराचा वापर करण्यात आला. अमरावतीहून पोलीस दलाच्या तुकड्या हजर झाल्यानंतर रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. संपूर्ण घटनेत आठ लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलीस जखमी आहेत. आतापर्यंत २६ लोकांना अटक करण्यात आली आहे. समाजाविरोधात पोस्ट करणारा आरोपी देखील अटकेत आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.

आणखी वाचा- बुलढाणा : ‘त्या’ सहा वर्षीय बालिकेचा अखेर मृतदेहच आढळला; दगडाने ठेचून हत्या, समाजमन सुन्न

सध्या अकोला पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. काल रात्रीच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानं अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे आवाहन भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.