अमरावती : महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (कर)  जांब नदीपात्रात ऐतिहासिक ‘गोटमार यात्रा’ भरते. यात्रेत अक्षरशः दगडफेकीचा खेळ खेळला जातो. नदीच्या मधोमध एक पळसाची फांदी रोवली जाते. तिला लाल कापड, नारळ, हार घातले जातात. पांढुर्णा आणि सावरगाव येथील रहिवासी नदीच्‍या दोन्‍ही तीरावर जमतात. काही लोक कुऱ्हाड घेऊन नदीत उतरतात आणि फांदी कापायला निघतात. दोन्‍ही बाजूचे गावकरी एकमेकांवर दगडफेक करतात. प्रतिस्पर्ध्याला फांदीपर्यंत पोचता येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते. अगदी गोफणीचा वापर करून लांबवर नेम साधला जातो. अखेर जो गट फांदी कापण्यात यशस्वी होईल त्याला विजेता घोषित करून चंडीमातेच्या जयघोषात हे युद्ध संपते. 

हेही वाचा >>> आमदार नरेंद्र भोंडेकर अपात्र होणार का ? मुंबईतील सुनावणीला हजर

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

ही गोटमार यात्रा कोणत्‍या कारणामुळे सुरू झाली, याविषयी अनेक दंतकथा आहेत. यात्रेला ३०० वर्षांचा इतिहास असल्‍याचे जाणकार सांगतात. पांढुर्णा येथील एका मुलाचे सावरगाव येथील मुलीवर प्रेम होते. त्‍यांच्‍या प्रेमप्रकरणाला दोन्‍ही गावातील लोकांचा विरोध होता. एक दिवस त्‍या प्रियकराने प्रेयसीला पळवून नेले. ते नदीपर्यंत पोहचले, तेव्‍हा गावकऱ्यांना माहिती मिळाली. गावकऱ्यांनी दगडफेक सुरू केली, त्‍यात दोघांचाही मृत्‍यू झाला. या घटनेचे प्रायश्चित म्‍हणून दरवर्षी गोटमार केली जाते, अशी आख्‍यायिका आहे. नागपूरचे भोसले राजे यांची पांढुर्णा येथे सत्ता होती. येथील कारभार पाहण्याचे काम त्यांनी दलपत शहा जाटबा नरेश यांच्याकडे दिले होते. परंतु नंतर शाह यांनी भोसल्यांसोबत दगाफटका केला आणि राज्य आपल्याकडे घेतले. भोसले यांच्‍या सैनिकांनी पांढुर्ण्यावर आक्रमण केले. शहा यांच्या सैनिकांनी गोटमार करून भोसलेचा पराभव केला. या युद्धाची आठवण म्हणून ही गोटमार होते, अशी आणखी एक आख्यायिका आहे. यात्रेत होणाऱ्या दगडफेकीपासून लोकांना परावृत्‍त करण्‍यासाठी प्रशासनाकडून अनेकवेळा प्रयत्‍न करण्‍यात आले, पण गावकऱ्यांनी त्‍याला जुमानलेले नाही.