नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना साकडे घातले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्हातील शेतकऱ्यांवरील कर्ज वसुलीकरिता त्यांच्या शेतजमीनी लिलावामध्ये काढलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थीती हालाकीची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव थांबवा, अनिल देशमुख यांचे फडणवीस यांना पत्र
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 31-01-2023 at 15:48 IST
TOPICSअनिल देशमुखAnil Deshmukhदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisनागपूरNagpurमहाराष्ट्रातील शेतकरीMaharashtra Farmers
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop auction farmers lands anil deshmukh letter to devendra fadanvis nagpur rbt 74 ysh