चंद्रपूर : म्हातारदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लॉयड्स मेटल स्पेन आयर्न अँड पॉवर कंपनीच्या वसाहतीचे अवैध बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनेश चोखारे, सचिन राजूरकर, म्हातारदेवीच्या सरपंच संध्याताई पाटील, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय टिपले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा – उपराजधानीत जड वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी, पोलिसांच्या नाकेबंदीचा उपयोग काय?
हेही वाचा – चंद्रपूर : कोळसा व्यावसायिकाच्या कार्यालय, निवासस्थानी छापे; आयकर विभागाची कारवाई
लॉयड्स मेटल स्पेन आयर्न अँड पॉवर कंपनी परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या बांधकामात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कामाची परवानगीसुद्धा ग्रामपंचायतकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई होईपर्यंत सदर बांधकाम थांबवण्यात यावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.