लोकसत्ता टीम

नागपूर : शहराचा विकास करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहे. भाजप नेते या सिमेंट रस्त्यांचे भांडवल करून शहराचा विकास झपाट्याने होतो आहे, असे ठासून सांगत आहेत. भाजपकडून शहरातील रस्ते चांगले आणि गुळगुळीत केले जात असल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, भाजपचेच दिग्गज नेते, नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या एका संघटनेने सिमेंट रस्त्याचे काम थांबवल्याचे समोर आले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शहरातील डांबरी रस्त्यांची दरवर्षी आणि वारंवार करण्यात येणारी डागडुजी पाहता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध भागात सिमेंट रस्ते तयार केले. जवळपास दोन टप्प्यांतील रस्त्यांची कामे सुरू असतानाच तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. अनेक भागातील सिमेट रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदाराक़डून डांबरी रस्ते खोदून ठेवण्यात आले, मात्र सिमेट रस्त्यांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आली असली तरी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही कामे अर्धवट स्थितीत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.

आणखी वाचा-विमा रुग्णालयांचा डोलारा प्रभारींवर; राज्यभरातील कामगारांना…

त्रिमूर्ती नगर परिसरातील नागरिक व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारीच या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. एकीकडे शहरातील भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे करण्यासाठी आग्रही आहेतस. तर, दुसरीकडे भाजपची संघटना असलेल्या भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी संथगतीने सुरू असलेल्या या कामाविरोधात एल्गार पुकारला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातील रिंग रोड ते ऑरेंज सिटी स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. स्वावंलबी नगरपासून राम मंदिराकडे जाणारा मार्ग एक महिन्यापासून खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. रिंग रोड पासून सुरू असलेल्या कामात सिमेंटचा अर्धा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले नाही. त्यामुळे लोकांची तेथून ये-जा सुरूच आहे. यातून तिथे अपघात होऊ लागले आहेत. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा त्रास होत आहे.

आणखी वाचा-Wardha Leopard: सावधान! वर्ध्यात बिबट, हिंगणघाटात वाघाचा वावर

भेंडे ले आऊट ते रिंग रोड सिमेट रस्त्याचे काम पूर्ण झाले, मात्र कंत्राटदाराने रस्त्याच्या क़डेला पेव्हर ब्लॉक्स लावलेच नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या अर्धवट असून त्यावर झाकणे नाही. कंत्राटदारांकडून सिमेट रस्त्यांची कामे जर वेळेत पूर्ण केली जात नसेल तर सिमेट रस्ते तयार का करता, अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील नागरिक व्यक्त करत आहेत.

या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी भाजयुमोचे प्रदेश सचिव देवा डेहनकर यांच्या नेतृत्वात आंदोलने करीत तक्रारी केल्या, मात्र नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी व कंत्राटदार काहीच पावले उचलत नसल्याने भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम रोखून धरले.

Story img Loader