वर्धा : करोना संक्रमण काळात अनेक गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. वर्षभरापासून बहुतांश थांबे टप्प्याटप्प्याने सुरू झाले. हिंगणघाट येथे मात्र स्थिती ‘जैसे थे’ असण्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रामदास तडस यांनी पाठपुरावा सुरू केला होता.
रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांना भेटून त्यांनी प्रवाशांच्या भावना सांगितल्या. थांबे बंद असल्याने लोक संतप्त असल्याचे दिसून येत होते. अखेर थांबे सुरू करण्याचे पत्र येवून धडकले आहे. चेन्नई ते माता वैष्णोदेवी कटरा अंदमान एक्स्प्रेस, चेन्नई ते जयपूर एक्स्प्रेस व गोरखपूर ते कोचुवेलू राप्ती सागर एक्स्प्रेस या गाड्यांचा थांबा मान्य करण्यात आला आहे. खुद्द रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या स्वाक्षरीने हे मंजूर थांबे तडस यांच्याकडे आले आहे.
हेही वाचा – बुलढाणा : चिखली ‘एमआयडीसी’तील एका गोदामाला आग
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने बंद थांबे पूर्ववत सुरू करण्याची मागणी करीत रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या गाड्या केव्हापासून थांबायला सुरुवात होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.