लोकसत्ता टीम
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. सोमवारी पहाटे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस कोसळला. यवतमाळ शहरात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकटात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस कोसळला. यावेळी गारपीटही झाली.
सोमवारी पहाटे झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळले. शहरात काही भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. एक तास मुसळधार पाऊस कोसळल्याने शहरातील अनेक नाल्या तुंबून पाणी रस्या तवर वाहत आल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. वडगाव रोड परिसरात ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरच वीज कोसळल्याने रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत आहे. महावितरणे ग्राहकांना संदेश पाठवनू ही माहिती दिली आहे. हा वीज पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत महावितरणनेही निश्चित सांगितलेले नाही. येथील लोहारा एमआयडीसी १३२ केव्ही सबस्टेशनवरून येणाऱ्या ३३ केव्ही लाईनवर वीज पडल्याने वडगाव येथील ३३ केव्ही, ११ केव्ही वीज वितरण केंद्र पूर्णत: बंद आहे.
यामुळे अर्ध्या यवतमाळ शहरात वीज पुरवठा खंडीत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कामे ठप्प पडली आहेत. ढगाळी वातावरण, वीज गुल आणि उकाडा यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अवकाळी वातावरण असून, यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर ऊन तापते, सायंकाळी वातावरण बदलून वादळी पाऊस, गारपीट होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मध्यरात्री वादळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित होत आहे.