लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे दिलासा मिळाला. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि तितकाच दमदार पाऊस यामुळे काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांर वर्गाची चांगलीच गैरसोय झाली.

सोमवारी रक्षाबंधनाचा दिवस असल्याने सर्वत्र सकाळपासून सर्वत्र वर्दळ होती. रविवारीच हवामान खात्याने सोमवारी वादळी पाऊस येणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आकाशातही ढगांनी गर्दी केली होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोबतीला जोराचा वाराही वाहात होता. त्यामुळे पावसाचा वेग आणि तीव्रता अधिक जाणवत होती. अवघ्या १०-१५ मिनिटाच्या पावसाने रस्त्यावर तळे साचले. विविध कामांसाठी सकाळी बाहेर पडलेल्या नागपूरकरांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

आणखी वाचा-चंद्रपूर : जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाचा गुराख्यावर हल्ला…

दुसरीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. अनेक शाळांना रक्षाबंधनची सुटी असल्याने पावसामुळे मुलांचा उडणारा गोंधळ टळला.

मुहूर्तानुसार रक्षाबंधनाची शुभवेळ दुपारनंतर आहे. त्यामुळे अनेक भगिनींनी भावाकडे जाण्यासाठी दुपारनंतर बेत आखला आहे. त्यावेळी पाऊस नसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यंदा नागपुरात व जिल्ह्यात उत्तम पाऊस झाला असून धरणे भरली आहे. नागपूरला पाणी पुरवठा करणारे पेंच धरणही भरले असून उन्हाळ्यातील पावसाची चिंता मिटली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stormy rain in nagpur roads under water in few minutes cwb 76 mrj