डॉ. आरती मोईत्रा.. अपघाताने कायमचे अपंगत्व आले.. एक पाय गमावला, पण त्या गमावलेल्या पायाची खंत त्यांच्या ‘पम्मी’ आणि ‘बाबू’ने जाणवू दिली नाही. आयुष्यभराची साथ देण्याचे वचन या दोघांनी डॉ. आरती यांना दिले आणि त्या वचनाला ते जागतसुद्धा आहेत. केवळ साथच नाही तर कित्येकदा मृत्यूच्या दाढेतूनही परत आणले आहे. त्यामुळे त्यांची आयुष्यभराची साथ ‘थँक्स’ या शब्दात मावणार नाही.
प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. आरती मोईत्रा आता प्राण्याच्या एकूणच मानसिकतेवर संशोधन करतात आणि हेच त्यांचे विश्वही झाले आहे. ‘रिडर्स डायजेस्ट’, ‘अमेरिकन मॅगझिन’ अशा अनेक मासिकांमध्ये त्या प्राण्यांच्या एकूणच मानसिकेवर लिखाण करतात. एका अपघातात त्यांनी पाय गमावला, पण त्यांच्याकडे असलेल्या ‘पम्मी’ आणि ‘बाबू’ या श्वानांनी कधी अपंगत्वाची उणीवच भासू दिली नाही. विषयाची सुरुवात करताच प्राणी कोणताही असो तो माणसापेक्षा अधिक प्रेमळ असतो. माणूस समजूनही न समजल्यासारखे करतो आणि कठीण प्रसंगात साथ देण्याऐवजी सोडून जातो. श्वानांचे मात्र तसे नाही. ते बोलू शकत नाहीत, पण त्यांची कृती बरेच काही बोलून जाते. त्यामुळेच माणसापेक्षा अधिक प्रेमळ आणि विश्वासाष्टद्धr(३९र्)ा ते आहेत. कोणत्याही आधाराशिवाय मला चालता येणे शक्य नसताना आज या दोन श्वानांच्या विश्वासाष्टद्धr(३९र्)ातेवर एकेरी आयुष्य सहजपणे जगता येणे शक्य झाले आहे. घरची फरशी पुसण्यापासून तर घरातली बरीचशी कामे हे दोन्ही श्वान करतात.
यातल्याच एका श्वानाने फरशी पुसण्याकरिता म्हणून फरशीवर पाणी टाकले होते आणि मला ते लक्षात आले नाही. कुबडय़ांच्या आधाराने मी खोलीतून जात असताना धाडकन पडले आणि त्या श्वानाच्या लक्षात आले. अतिशय केविलवाण्या आणि अपराधी भावनेने ती माझ्य़ाकडे बघू लागली. मला उचलणे तर त्या श्वानाला शक्य नव्हते, पण बाहेर जाऊन तिने फाटकावर जोरदार लाथा झाडायला आणि ओरडायला सुरुवात केली. शेजाऱ्यांच्या ते लक्षात आले आणि त्या श्वानाने त्या शेजाऱ्यांचे कपडे पकडून घरात आणले. शेजारी सहकार्य करत असतानाच तो श्वानसुद्धा मला कुठे लागले तर नाही ना, याची चाचपणी करत होता. पंज्यातून पाणी आणून चेहऱ्यावर टाकत होता. हा एकच प्रसंग नाही तर जबलपूरमध्ये भूकंप आला तेव्हादेखील याच श्वानांनी जीव वाचवला. भूकंपाच्या लहरी जाणवताच श्वानाने ओढून घराबाहेर काढले. घराच्या बाहेर पडताच छतावरचा पंखा कोसळला आणि एका मोठय़ा प्रसंगातून आपण वाचलो याची जाणीव झाली. त्यावेळी तर साक्षात मृत्यूने धडक दिली होती, पण जीव वाचवला तो या श्वानांनी!
त्यांचा हा प्रेमळपणा, त्यांची ही काळजी, त्यांची ही विश्वासाष्टद्धr(३९र्)ाता ‘थँक्स’ या एका शब्दात मावणारी नाही, पण तरीही त्यांचे आभार मात्र नक्कीच मानावे लागतील.