अकोला : महिला व बालविकास विभागाच्यावतीने रस्त्यांवरील बालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार महिला व बालविकास विभागाच्यावतीने रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. जिल्ह्यातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिरे, टॉवर चौक, आदी गर्दीच्या व वर्दळीच्या परिसर, ग्रामीण भागात व सर्व तालुक्यात हे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा – गडचिरोली : सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान; नक्षलवाद्यांच्या पत्रकाने खळबळ

या मोहिमेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, राजेश देशमुख, ॲड. शीला तोष्णीवाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, पद्माकर सदाशिव, हर्षाली गजभिये, सुनील सरकटे, सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, अपर्णा सहारे, नागसेन दामोदर आदी सहभागी झाले.

हेही वाचा – आदिवासीबहुल भागात कोतवाल भरती, मात्र आदिवासींनाच ‘आरक्षण’ नाही

मोहिमेदरम्यान रस्त्यावर आढळून आलेल्या पाचपैकी चार बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. एका बालिकेस बालिकाश्रमात पाठवण्यात आले. हे सर्वेक्षण सुरू राहणार असून बेवारस पद्धतीने एकटे फिरणारे बालके आढळल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला तत्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street children will be rehabilitated through survey ppd 88 ssb