डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

कुठल्याही जातीत कर्मठपणा निर्माण झाला की तेथे वाहत्या पाण्याचे डबके तयार होते. आंबेडकरवादामध्येही कर्मठ आणि निखळ आंबेडकरवाद अशी विभागणी करण्याची वेळ आज आली आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत प्रत्येक जातीतील कर्मठपणा हा एकप्रकारे ब्राह्मणवादच असतो, या निष्कर्षांवर आता विचारवंतांनी लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक

दिवंगत कवी प्रा. वामन निंबाळकर लिखित ‘वाहत्या जखमांचा प्रदेश : आकलन व समीक्षा’ आणि ‘चळवळीचे दिवस’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस आणि माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते सोमवारी झाले.

वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सोहोळ्यात दोन्ही पुस्तकांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भाष्य केले. व्यासपीठावर स्नेहलता निंबाळकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, स्नेहलता खंडागळे उपस्थित होते.

माणसामाणसात पेरलेला भेद अन्यायकारक आहे आणि म्हणून धार्मिक मानवतावाद हा वांझ तर निखळ, बुद्धिवादी, वस्तुनिष्ठ मानवतावाद हा प्रेरक आणि मानवतेला न्याय देणारा असतो. या दोन प्रवाहातून वामन निंबाळकरांची सत्यवादी, वस्तुनिष्ठ असणारी भूमिका औदार्याची आहे, असेही प्रा.डॉ. सबनीस म्हणाले.

बाबासाहेबांचे विचार लोकांमध्ये रुजवण्याचे कार्य प्रा. वामन निंबाळकर यांनी केले. त्यांचे साहित्य प्रकाशित करणे हे त्यांच्या पत्नीचे नाही तर समाजाचे कार्य होते, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले. स्नेहलता निंबाळकर यांनी वामनरावांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा ध्यास कौतुकास्पद असल्याचे गिरीश गांधी यांनी सांगितले.  वामनरावांच्या दलित पँथरच्या प्रवासाचा साक्षीदार असल्याची आठवण त्यांनी जागविली.