लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असून, या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

जलजीवन मिशनबाबत बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ३९ गावांतील पाणीपुरवठा योजनांचा जलस्त्रोत असलेल्या विहिरीच्या उद्भव क्षेत्रात जल पुनर्भरणासाठी ‘रिचार्ज शाफ्ट’ व ‘रिचार्ज स्ट्रेंच’ बसविण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय परिपूर्ण नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी व कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.

आणखी वाचा-१३.८३ लाख नागरिकांची कुष्ठ व क्षयरोग तपासणी होणार

दख्खनच्या पठारात आढळणाऱ्या बेसाल्ट या खडकात जिल्ह्यातील बहुतांश पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित करण्यात आले आहेत. या खडकात पाणी उपलब्धतेबाबत कुठेही निश्चित अशी समानता आढळून येत नाही. त्यामुळे पेयजलाच्या स्त्रोताच्या वरील बाजूस किमान ५०० मीटरपर्यंत स्त्रोत बळकटीकरणासाठी कामे घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे ‘रिचार्ज शाफ्ट’ व ‘रिचार्ज स्ट्रेंच’ निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींच्या क्षेत्रात भूजलात वाढ व्हायला मदत होईल, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक कराड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strengthening of water resources in villages through jaljeevan mission ppd 88 mrj
Show comments